राजकारणात राहून समाजकारणासाठी लढणारा खान्देशचा लाडका नेता म्हणजे सुरेशदादा जैन. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1943 रोजी महाराष्ट्रातील धुळे येथे झाला. सुरेशदादांनी खान्देशसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. राजकीय पक्षांच्या राजकारणातही ते आपली माणुसकी, शहराच्या विकासाचा ध्यास व आपल्या कुटुंबाचे संस्कार कधी विसरले नाही. दातृत्वभाव, कर्तव्यनिष्ठता, निस्सिम भक्तीभाव, आपण समाजाचं देणं लागतो ही भावना, चारित्र्यशील, निर्व्यसनी या गुणांमुळेच त्यांना ‘राजकारणातील हिरा’ असे संबोधले जाते.

02_18_Website (450x450px) Post

सुरेशदादा जैन यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य

मा. सुरेशदादा जैन यांनी आपल्या
अथक परिश्रमांनी
वाघुर प्रकल्पाद्वारे
जळगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला.

सुरेशदादांनी शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या मोठ्या जागांवर पक्क्या बांधकामाची मार्केट व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरातील फुले मार्केट व बी.जे. मार्केट होय.

शहरातील मनोरंजनाचे केंद्र असलेल्या उद्यानांचे सेवाभावी संस्थाच्या मदतीने सुशोभीकरण केले व उजाड जागेवर नवीन उद्यानांची निर्मिती केली. अन्य ही उद्यानांची कामे प्रगतीपथावर आहे.

मेहरूण तलाव येथील गणेश घाट स्वच्छ करण्यात आला असून हे शहरवासियांसाठी विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण ठरत आहे.

शहरातील विविध चौकांचे सुशोभीकरण करून शहर सौंदर्यात भर घातली आहे

सुरेशदादांनी एस.डी. सीड या शैक्षणिक योजनेतून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देवून त्यांच्या उज्ज्वल भविष्याला चालना दिली.

[rev_slider_vc alias=”election”]

Read more free pokies for mobile