http://shivsenajalgaon.com/wp-content/uploads/2018/07/shivsenabanner.jpg

  शिवसेना..! नाव वाचता क्षणी मेंदूत विचार, मनात अभिमान आणि शरीरात रक्त सळसळतं. नावात काय ठेवलयं? असं म्हणणार्‍या प्रत्येकाला शिवसेना नाव ऐकल्यावर मराठी सन्मानाचा काटा अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. 1961 च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. मराठी मुलूखाच्या आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाचं जगणं अत्यंत दयनीय होतं. शहरातील अमराठी टक्का हा सरकारी नोकर्‍यांवर वर्चस्व करत होता. सरकारला मराठी माणसाची पर्वा नव्हती. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी मराठी संघटनेची फार गरज झाली होती. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला आपल्या स्वत:च्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी लढता यावं, सर्व अधिकार अभिमानाने मिळावे यासाठीच 19 जून 1966 साली बाळासाहेब यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेना म्हणजे शिवाची सेना. छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेचे आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांची आई भवानी मातेवर निस्सिम श्रद्धा होती व आई भवानी मातेचे वाहन वाघ आहे. वाघाप्रमाणेच निर्भीड, रूबाबआक्रमकता या गुणांप्रमाणेच शिवसेना असल्यामुळे शिवसेनेचे बोधचिन्ह वाघ असावं हा विचार बाळासाहेबांच्या मनात आला व त्यांनी स्वत: हे बोधचिन्ह साकारलं. त्यानंतर शिवसेनेने प्रत्येक मराठी मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटवून अभिमानाची ज्वालामुखीच निर्माण केली. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा आपला पक्ष म्हणजे शिवसेना हे लोकांच्या मनावर कोरल्या गेला व आजही ते अभिमानाने कोरलेले आहे.

शिवसेना म्हणजे झंझावात वादळ

1) शिवसेनेच्या स्थापनेनंतर चार महिन्यातच 30 ऑक्टोबर 1966 रोजी महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या नवीन जीवनासाठी शिवतीर्थ मैदानावर आयोजित पहिल्या मेळाव्यात लाखो जनतेची गर्दी हीच शिवसेनेच्या स्वीकाराची पावती होती.

2) शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती करून मराठी माणसाला जागं केलं व त्याला लढायला पूर्णपणे तयार केले.

3) राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये तरूणाला शिक्षण मिळावयास हवे हा शिवसेनेचा ध्यास आहे.

4)  जात, धर्म, भाषा यामध्ये मतभेदांचे बळी पडू नये हीच शिवसेनेची शिकवण आहे

5) 1989 साली बाळासाहेब यांनी ‘सामना’ हे मराठी दैनिक सुरू केले.

6)  महाराष्ट्रातील शासकीय सेवेत मराठी तरूणांना प्राधान्य असावे यासाठी बाळासाहेब सदैव झटले.

7) सामाजिक, राजकीय तसेच इतर सर्व क्षेत्रातील चुकीच्या घडामोडींवर बाळासाहेब आपल्या व्यंगचित्रातून नेहमीच टिका करत व परखडपणे आपले मत मांडत.

8) 1993 साली मुंबईत दंगल उसळली होती. त्यावेळी केवळ शिवसैनिकांमुळे मुंबई येथील विघातक परिस्थिती आटोक्यात आली होती.

9) शिवसैनिकांनी केवळ मराठी लोकांसाठीच नव्हे तर सर्व जाती धर्मासाठी तितक्याच आत्मियतेने लढा दिला.

sena

शिवसेना नेते

Bal Thackeray

बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख

Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे

शिवसेना अध्यक्ष

Aditya Thackeray

आदित्य ठाकरे

युवासेना अध्यक्ष

Suresh Dada Jain

सुरेशदादा जैन

माजी आमदार

Gulabrav Patil

गुलाबराव पाटील

सहकारराज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य

Chandrcant Sonwane

चंद्रकांत सोनावणे

आमदार