More info here free pokies for mobile phones

जळगाव शहर नगरपालिका

जळगाव शहरातील नगरपालिकेची 1985 पूर्वीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. नगरपालिकेच्या जागांवर झोपडपट्ट्या, टपर्‍या व दुकाने यांचे अतिक्रमण होते. नगरपालिकेच्या मालकीच्या मार्केटमधील गाळे हे नगरपालिकेच्या परवानगी विना भरमसाठ नफ्याने परस्पर विकले जात होते. बाजारपेठेची आखणी सुव्यवस्थित नसल्यामुळे मार्केटमध्ये येजा करण्यास पुरेशी जागा नव्हती. यामुळे सर्वांची गैरसोय होत होती. तसेच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी निधीचा तुटवडा असल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होती. पाणी पुरवठा विभागात 1 लाखाची कामे टेंडरशिवाय करण्यात येत होती. करांची आकारणी, वसूली योग्यरित्या होत नव्हती. एकूणच प्रशासकीय कारभाराबद्दल जनतेत असंतोष होता.

02_18_Website Old Mahanagar Palika (300x300px) Post

नवीन जळगाव मनपा

जळगाव शहर महानगरपालिकेची स्थापना 21 मार्च 2003 रोजी झाली. जळगाव मनपाच्या पहिल्या महिला महापौर होण्याच्या मान श्रीमती आशाताई कोल्हे यांना मिळाला. जळगाव मनपाचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ 68.78 चौरस किमी असून आज सुमारे साडे सहा लाख लोकांना नागरी सुविधा देण्यात येत आहे. जळगाव हे केळी, कापूस व सोने यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच महाराष्ट्रातील एकूण केळी उत्पादनात जळगाव शहराचा अर्धा वाटा आहे. शहरातील नगरपालिकेची परिस्थिती वाईट असतांना 1985 साली खंबीर, सामर्थ्यवान व दूरदृष्टी असणारे मा. सुरेशदादा जैन नगरपालिकेत निवडून आल्यानंतर त्यांनी शहराची सुत्रे हातात घेतली व शहरात शांतता आणि सुव्यवस्थेची बीजे रोवली. सुरेशदादा जैन यांच्या अथक प्रयत्नांमुळे शहरातील मोक्याच्या जागेवरील मार्केटचे नूतनीकरण करून नवीन इमारत बांधून फुले मार्केटचे रूप पालटले व शहरातील व्यापाराला प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या. वाघुर प्रकल्पाच्या यशाने शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असून भविष्यात देखील पाण्याची टंचाई भासणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. शहरातील शाहू महाराज हॉस्पिटल येथे सेवाभावी संस्थांच्या मदतीने मोफत आरोग्यदायी सुविधा देण्यात येत असून अन्य 4 रूग्णालयांची कामे प्रगतीपथावर आहे. जळगाव मनपाच्या विकासात्मक प्रकल्पांचा आदर्श घेवून इतर शहरातील मनपा कामे करीत आहे. जळगाव मनपा वर खर्चाचा बोजा पडू नये यासाठी सेवभावी संस्थांच्या मदतीने शहरातील उजाड जागेंवर नवीन उद्यान व जुन्या उद्यानांचे नूतनीकरण करून शहर सौंदर्यात भर घातली आहे. जळगाव शहर हे व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, जलव्यवस्थापन, वैद्यकीय, स्वच्छता आदी क्षेत्रात प्रगती करत असून जळगावातील विविध प्रकल्प पूर्णत्वास आले आहे व अन्य ही विकासात्मक कामे सुरू आहेत. सुरेशदादा जैन हे आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले असून त्यांच्या परिश्रमांमुळेच आज शहर प्रगतीच्या वाटेवर आहे.